विदर्भ मंडळ अधिकारी संघाची सभा पार पडली


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : विदर्भ मंडळ अधिकारी संघाची केन्द्रीय सभा नुकतीच विदर्भातील उपराजधानी नागपूरात पार पडली .सभेला नागपूर, चंद्रपूर, बुलठाणा, अमरावती, वाशिम, अकाेला, गडचिराेली, वर्धा, व गाेंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी प्रतिनिधी,व मंडळ अधिकारी उपस्थित हाेते. दरम्यान, याच सभेच्या आरंभी या वर्षासाठी नविन कार्यकारणीची निवड निवडणूक पध्दतीने करण्यांत आली. त्यात या वेळेस चंद्रपूर जिल्ह्याचे मूल निवासी सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम काेमलवार गटाचे या निवडणूकीत वर्चस्व कायम राहिले. सदरहु निवडणूकीत अध्यक्षपदासाठी काेमलवार गटाचे बुलठाण्याचे विजय डेकाटे यांनी गत पाच वर्षापासून अध्यक्ष असलेले काटकर यांचा दणकून पराभव केला तर उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम काेमलवार व सरचिटणीस पदी नागपूरचे शे.बा.चव्हाण हे अविराेध निवडूण आले. नागपूरात आयोजित करण्यांत आलेल्या सभेत मंडळ अधिकारी यांचे आर्थिक व सेवा विषयक मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यांत आली.

शासनस्तरावर या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यांचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे काेमलवार यांनी आज या प्रतिनिधीस चंद्रपूर मुक्कामी सांगितले. सभेला विदर्भातील मंडळ अधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
विदर्भ मंडळ अधिकारी संघाची सभा पार पडली विदर्भ मंडळ अधिकारी संघाची सभा पार पडली Reviewed by सह्याद्री चौफेर on December 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.