संत शिराेमणी श्री जगनाडे महाराज जन्माेत्सव निमित्त उद्या घूग्घूस नगरीत भव्य रक्तदान शिबिर व स्वर्गरथ लाेकार्पण साेहळा
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून आेळखल्या जाणा-या घुग्घूस येथे उद्या बुधवार दि.८ डिसेंबरला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विदर्भ तेली समाज महासंघ शाखा घूग्गुसच्या वतीने स्थानिक गांधी चाैकात सकाळी १० वाजता संत शिराेमणी श्री जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर तथा स्वर्गरथ लाेकार्पण साेहळ्याचे आयोजन करण्यांत आले आहे.
उपरोक्त कार्यक्रमाला तैलिक समाज बांधवानी माेठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन विदर्भ तेली समाज महासंघ शाखा घूग्घुसच्या पदाधिकारी व सदस्यांनी एका पत्रकातुन केले आहे. आज पावेताे अनेक सामाजिक कार्यात या शाखेचे कार्य अतिशय उल्लेखनिय व माेलाचे राहिले आहे.
संत शिराेमणी श्री जगनाडे महाराज जन्माेत्सव निमित्त उद्या घूग्घूस नगरीत भव्य रक्तदान शिबिर व स्वर्गरथ लाेकार्पण साेहळा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 07, 2021
Rating:
