विदर्भ राज्याच्या मागणीसाठी चंद्रपूरात निदर्शने - शेकडाें कार्यकर्त्यांची उपस्थिती,पाेलिसांचा कडेकाेट बंदोबस्त !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : गत १०५ वर्षांपासून विदर्भ राज्याच्या मागण्यांसाठी उपराजधानीसह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आंदाेलने,माेर्च धरणे,बैठा सत्याग्रह, निदर्शने करण्यांत आली परंतु आज पावेताे या मागणीला यश प्राप्त झाले नाही. याच मागणीच्या अनुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज मंगळवार दि. ७ डिसेंबरला चंद्रपूर शहराच्या जटपुरा गेट जवळील महात्मा गांधी पुतळ्या जवळ सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी दीड वाजे पर्यंत राजूरा विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव चटप यांचे नेत्रूत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी करीत निदर्शने केली.
आजच्या आंदाेलनात शेकडाे कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला हाेता.दरम्यान या आदाेलनाच्या,निमित्ताने पाेलिस प्रशासनाच्या वतीने तगडा पाेलिस बंदोबस्त जटपूरा गेट परिसरात ठेवण्यांत आला हाेता. आदाेलन वेळी काेणतीही अप्रिय घटना घडली नाही.
विदर्भ राज्याच्या मागणीसाठी चंद्रपूरात निदर्शने - शेकडाें कार्यकर्त्यांची उपस्थिती,पाेलिसांचा कडेकाेट बंदोबस्त !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 07, 2021
Rating:
