चंद्रपूर : येत्या नविन २०२२ या वर्षात एक सुट्टी जाहीर करा - क्रां.नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेची जिल्हाधिका-यांकडे मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असुन याच प्रदेशात बाबुराव शेडमाके या स्वातंत्र्यविरांचा जन्म झाला आहे. तदवतचं जल, जंगल, जमीन या साठी आपल्या प्राणाची आहुती देणारे जननायक बिरसा मुंडा हे क्रांतिकारक आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासीच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी एक जाहिर नामा प्रसिध्द करुन ९ ऑगष्ट हा जागतिक आदिवासी गाैरवदिन घाेषित केल्याचे सर्वश्रूतच आहे. उपरोक्त तीन दिवसांचे आदिवासी समाजाला फार महत्व आहे. एव्हढेच नाही तर त्यांच्याशी या समाजाच्या भावना जुळल्या आहे. वरील सर्व बाबीचा विचार करता ९ ऑगष्ट, २१ ऑक्टाेबर किंवा १५ नाेव्हेंबरला (या पैकी एका दिवसाला) एका दिवसाची आपल्या अधिकार क्षेत्रातील सार्वजिक सुट्टी जाहिर करावी अश्या आशयाच्या मागणीचे एक लेखी निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना आज गुरुवार दि.३० डिसेंबरला क्रां. नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेच्या वतीने सादर करण्यांत आले.
 
सदरहु निवेदन सादर करतांना जागर तथा उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष अशाेक तुमराम, बिरसा क्रांति दलाचे सचिव जितेश कुळमेथे, अ.भा.आदिवासी युवा परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गेडाम, आदिवासी विद्यार्थी संघचे कंटु काेटनाके, सामाजिक कार्यकर्ता अशाेक उईके, बिरसा क्रांति दलचे राहुल पेंदाम आदीं उपस्थित हाेते.
चंद्रपूर : येत्या नविन २०२२ या वर्षात एक सुट्टी जाहीर करा - क्रां.नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेची जिल्हाधिका-यांकडे मागणी चंद्रपूर : येत्या नविन २०२२ या वर्षात एक सुट्टी जाहीर करा - क्रां.नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेची  जिल्हाधिका-यांकडे मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on December 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.