प्रदुषणाचा हाेताेय नागरिकांना अधिक त्रास- लॉयडस् मेटल कंपनीच्या विराेधात घुग्घुस शहर काँग्रेसचे आंदोलन


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : औद्योगिक नगरी म्हणून आेळख असणा-या घुग्गुस शहरात आज गुरुवार दि. ३० डिसेंबरला सकाळी ११ वाजता स्थानिक गांधी चौक पासून तर लॉयड्स मेटल कंपनी गेट पर्यंत शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वात लॉयड्स मेटल कंपनीच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या माेर्चात महिला नेत्या संगीता बोबडे, निर्मला जोगी, पुष्पा नक्षिणे यांचेसह शहरातील अन्य महिला व युवक कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. आंदाेलनाच्या संदर्भात राजू रेड्डी यांनी समाज माध्यमातून दाेन दिवसांपुर्वीच या मोर्चात माेठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी हाेण्यांचे आवाहन केले हाेते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक या मोर्चात सहभागी झाले हाेते. घुग्गुस वासियांच्या दृष्टीकाेणातुन त्यांच्या मागण्या रास्त हाेत्या. सदरहु कंपनीच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांना बराच त्रास करावा लागत असुन विविध आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे बाेलल्या जाते. त्याच साेबत या कंपनीत स्थानिकांना राेजगार न देता बाहेरच्या लाेकांना राेजगार देत असल्याची खंत अनेकांनी या वेळी बाेलून दाखविली.

गांधी चौकातुन घोषणा देत निघालेला हा मोर्चा लॉयड्स मेटल कंपनीच्या गेटवर पाेहचला त्या ठिकाणी लॉयड्स मेटल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलनकर्त्यांशी चर्चा केली नंतर मागण्यांचे एक लेखी निवेदन त्यांना सादर करण्यांत आले. या माेर्चाने आज नागरिकांचे लक्ष वेधून घेतले हाेते.
 
प्रदुषणाचा हाेताेय नागरिकांना अधिक त्रास- लॉयडस् मेटल कंपनीच्या विराेधात घुग्घुस शहर काँग्रेसचे आंदोलन प्रदुषणाचा हाेताेय नागरिकांना अधिक त्रास- लॉयडस् मेटल कंपनीच्या विराेधात घुग्घुस शहर काँग्रेसचे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on December 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.