सह्याद्री न्यूज नेटवर्क |
झरी : तालुक्यातील मुकूटबन येथे जनसुनावणीच्या वेळी प्रत्येक शेतकऱ्याला कंपनीत नोकरीवर घेऊ असे लॉलीपॉप दाखवून येथील अनेक शेतकऱ्यांनी दहा वर्षापूर्वी स्वतः ची शेती आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीला विकत दिली.
चार वर्षापासून आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीचे युद्ध स्तरावर काम सुरू आहेत. परंतु स्थानीक शेतकरी पुत्रांना कंपनीत कामावर घेण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. सिमेंट कंपनीत काम करण्याकरीता हवे तेवढे शिक्षण युवकाकडे आहे परंतु स्थानिकांना कामावर घेण्यास कंपनी डावलत आहे. या कंपनीत स्थानिक बेरोजगारांना कंपनीत हक्काच्या नोकऱ्या तर मिळाल्याचं नाही त्यामुळे बेरोजगार शेतकरी पुत्र सिमेंट प्रकल्पाच्या विरोधात आज गुरुवार (ता. ३०) पासून आंदोलन करीत आहे. मागणी मंजूर न झाल्यास आमरण उपोषण सुध्दा करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यानी दिला आहे.
मुकूटबन ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाण पत्र देताना शेतकरी पुत्रांना रोजगार, शहराच सौन्दर्यीकरण या बाबीच ठोस आश्वासन दिले. दहा वर्षापासून येथील स्थानिक बेरोजगारांना मोठी आशा लागली होती की, सिमेंट कंपनीत प्रत्येक तरुणांच्या हाताला मागेल तेवढा रोजगार मिळेल. परंतु कंपनीने शेतकरी पुत्रांच्या हातात तुरी देण्याचं काम केलं आहे. लोकप्रतिनिधी सुध्दा या बाबीकडे लक्ष देत नाही.
मुकूटबनात परप्रांतीयांचा एक प्रकारे अड्डाच बनला असून परप्रांतीयांचा भरणाच कंपनीत आहे. तरूणांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी सिमेंट कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, अच्छे दिन आने वाले है, असे नाना तऱ्हेची आश्वासनाची खैरात वाटली गेली. मात्र आता कंपनीचे अच्छे दिन व तरूणांचे बूरे दिन आल्याने कंपनीला शेती दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला प्रा. लि. कंपनीने मुकूटबन मध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्तीपत्र देऊन थेट कंपनीत समाविष्ट करून नौकरीवर घेण्यात यावे. कंपनीच्या नियमानुसार वेतन देण्यात येऊन भविष्य निर्वाह निधी (प्रोव्हिडेंट फंड) कपात करुन इतर सेवा सवलती देण्यात यावे. या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
शेतकरी पुत्रांचे सिमेंट प्रकल्पच्या विरोधात आंदोलन सुरू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 30, 2021
Rating:
