सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
अमरावती : नागरिकांना अर्ज लिहायला मदत करण्यापासून झेरॉक्स, फॉर्म, सेतू कक्ष व इतर सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी असे वेगवेगळे अधिकारी- कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने प्रत्येक ठिकाणी सही-शिक्क्यासाठी स्वतंत्रपणे जाण्याची गरज भासत नाही. या सुलभ प्रक्रियेमुळे नागरिकांची कामे होऊन त्यांना दिलासा मिळतो. आपण ‘नायक’ हा चित्रपट पाहिला होता. तो पाहून मला अशा शिबिराची कल्पना सुचली. पंधरा वर्षांपूर्वी मी हा उपक्रम सुरू केला. आता मेळघाटातही हा उपक्रम सुरु केला आहे. अभियानात मोठी ताकद असते. त्यामुळे पारदर्शकता निर्माण होऊन गैरव्यवहार रोखायला मदत होते, असेही श्री. कडू यांनी सांगितले.
मेळघाटात प्रथमत:च हा कार्यक्रम घेतला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मेळघाटात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. मेळघाटातील दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला आहे, अशी प्रक्रिया आमदार श्री. पटेल यांनी व्यक्त केली.
अर्ज लिहिण्यापासून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 16, 2021
Rating:
