सह्याद्री न्यूज नेटवर्क |
केळापूर : हैद्राबादकडून नागपूरच्या दिशेने औषधी घेऊन जाणार्या ट्रकच्या चालकास बांधून तब्बल 25 लाखांची औषधीचे डबे लंपास केल्यामुळे प्रकरणी मोठी खळबळ माजल्याने पांढरकवडा पोलिसांनी ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात विविध पथके गठीत करून या धाडसी दरोड्याचा शोध लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यास मोठे यश प्राप्त झाले असून चोरीचा माल पळवून नेणारा ट्रक जप्त करण्यात आला.
हैद्राबाद येथील रेड्डी फार्मा कंपनीतून कंटेनर क्रंमांक एचआर47 9218 ने लाखो रुपयांची औषधी नेल्या जात होती. त्या ट्रकला राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर पांढरकवडा तालुक्यातील मराठवाकडी येथे वाहकाचे हातपाय बांधून ट्रक पळविण्यात आला. त्यानंतर तो ट्रक पोलिसांना त्याच महामार्गावर 15 किमी दूर कोंघारा या गावी आढळून आला. परंतु त्यातील 494 औषधी भरलेले खोके दुसर्या वाहनांतून चोरी करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. पांढरकवडा पोलिस उपनिरीक्षक संदीप बारिंगे यांना हैदराबाद, तर सहायक निरीक्षक विजय महाले आणि उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे, राजू मोहुर्ले, राजू बेलयवार, सचिन काकडे, सूरज चिव्हाणे यांना मध्यप्रदेशच्या दिशने आरोपींचा मागोवा घेण्यासाठी पाठवले होते.
मध्यप्रदेशकडे गेलेल्या पथकाने देवास आणि इंदूर परिसरात आठवडाभर आपले कौशल्य पणास लावून गुन्ह्यातील संशयित आरोपी विक‘मसिंह उजालदे यास ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवीत विचारपूस केली. तेव्हा त्याने लुटलेला माल ट्रक क्र. एमएच 19 झेड 5030 ने आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी या ट्रकसह चालक अजय उजालदे यास ताब्यात घेईल. पोलिसांनी हैदराबाद ते नागपूरपर्यंत सर्व टोलनाक्यांवरील कॅमेरे आणि फास्टटॅगच्या नोंदी तपासून संशयित गाड्यांची यादी तयार केली. त्यात दोन ट्रक आणि दोन महागड्या मोटारी औषधी ट्रकच्या मागेमागे येत असल्याने त्यावर लक्ष केंद्रित केले होते. या चार गाड्या घटनास्थळापासून प्रचंड वेगाने इंदूरपर्यंत गेल्याचे तपासणीत आढळून आल्याने पोलिसांनी इंदूरवर आपले लक्ष केंद्रित केले होते आणि देवासमध्ये याचा उलगडा करण्यात यश आले.
देवास जवळील लहानशा खेड्यात धावत्या ट्रकला लुटणारी मोठी टोळी असून अनेक राज्यात या टोळीने ट्रकवर अनेक धाडसी दरोडे घातले आहेत. हा ट्रक आरोपींनी भाड्याने केल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत असल्याने दरोड्यातील मु‘य सूत्रधार आणि त्यांना मदत करणारे आठ ते दहाजण यांना लवकरच अटक करणार असल्याचे पांढरकवडा पोलिसांनी सांगितले. हा यशस्वी तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ व पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. काही वर्षांत पांढरकवडा शहरातील घरफोड्या, महामार्गावर झालेल्या चोर्यांचा उलगडा झालाच नव्हता. त्यामुळे या धाडसी दरोड्याचा उलगडा करून पांढरकवडा पोलिसांनी कौतुकाची थाप मिळवली आहे.
25 लाखांच्या औषधी चोरी प्रकरणात पांढरकवडा पोलिसांना मोठे यश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 16, 2021
Rating:
