युवकाची विष प्राशन करून आत्महत्या


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : तालुक्यात आत्महत्या ची धग कायम च दिसून येतेय. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर विषयाकडे विशेष लक्ष घालणे आता आवश्यक झाले म्हणायला हरकत नाही. दिवासेंदिवस आत्महत्या चे प्रमाण वाढल्याचे वृत्त समोर येत असताना आणखी म्हैसदोडका येथील एका 25 वर्षीय युवकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आकाश गोविंदा चहारे (25) असे विष प्राशन केलेल्या मृत युवकाचे नाव आहे. 

 म्हैसदोडका येथील आकाश याने सर्व कुटुंबातील सदस्यांना शेतात गेले असल्याचे पाहून विष प्राशन केले. गुरूवारला ६ वाजता च्या दरम्यान, त्याची माय शेतातून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्याला उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे भरती केले. परंतु उपचार घेत असताना उपचारादरम्यान (ता.9 डिसें.) ला सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या आत्महत्येचे कारण असून अस्पष्ट या घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहेत. आकाश यांच्या पाठीमागे आई व एक मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.
युवकाची विष प्राशन करून आत्महत्या युवकाची विष प्राशन करून आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on December 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.