ऑल इंडिया पँथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार व कार्यकर्त्यांवर लावलेले गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या - रुपेश निमसरकार यांची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : ऑल इंडिया पँथर सेनेचे सरसेनापती संघर्षनायक व बहुजनांचे नेते दिपक केदार यांनी चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रात व इतरही राज्यात बहुजनावरील अन्याय व अत्याचार विरोधात आवाज उठवला असून न्याय मिळण्यासाठी संघर्ष केला आहे. त्याही नंतर समाजाच्या शोषणाविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. मात्र दि. ०६.१२.२०२१ रोजी चैत्यभूमी, दादर मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकजी केदार आणि कार्यकर्ते गेले असता मुंबई पोलिस प्रशासनाने याचा मज्जाव केला. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना अटक करून राञी उशीराने त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तरी गृहखात्याने त्याच्यावरील व कार्यकर्त्यां वरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, याकरीता ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून जिल्हाधिकारी यांना कळविण्यांत आले की, ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्यावर लावलेले गंभीर खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा चंद्रपूर जिल्हा बंद करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पँथर सेना चंद्रपूरच्या वतीने आज देण्यात आला आहे. 

निवेदन देतांना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, चंद्रपूर जिल्हा सल्लागार संताजी डांगे, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, धनपाल राहुलगडे, अतुल भडके, निशाल मेश्राम व इतर पँथर कार्यकर्ते उपस्थिति होते.
ऑल इंडिया पँथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार व कार्यकर्त्यांवर लावलेले गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या - रुपेश निमसरकार यांची मागणी ऑल इंडिया पँथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार व कार्यकर्त्यांवर लावलेले गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या - रुपेश निमसरकार यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on December 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.