मोमीनपुरा येथे बालकांवर द्रव्य फेकण्याचे प्रकार सुरूच, तीन दिवसांत तीन चिमुकल्यांवर फेकल्या गेले द्रव्य
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
मोमीनपुरा येथील चिमुकल्या बालकांवर द्रव्य फेकणारा विकृत व्यक्ती नागरिकांच्या रोषाचे तर पोलिसांच्या डोकेदुखीचे कारण ठरू लागला आहे. कुणाच्याही न कळत चिमुकल्यांवर द्रव्य फेकून तो पळ काढत असल्याच्या घटनेने सध्या रान उठवले आहे. या व्यक्तीचा पोलिस कसून शोध घेत असून नागरिकही आता त्याच्या पाळतीवर आहेत. २५ डिसेंबरला एका चार वर्षाच्या बालिकेवर, २६ डिसेंबरला सहा वर्षाच्या बालकावर तर आज २७ डिसेंबरला परत चार वर्षाच्या बालकावर एका अज्ञात व्यक्तीकडून द्रव्य फेकण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटना घडवून हा विकृत मानसिकतेचा व्यक्ती चर्चेचे बनू लागला आहे. या द्रव्यामुळे कुणालाही दुखापत झाली नसली तरी असे करण्यामागची त्याची मानसिकता काय, याचा शोध घेणे आता जरुरीचे झाले आहे. समाजात विद्रोह निर्माण करू पाहणाऱ्या या विकृताला लवकरात लवकर पकडणे गरजेचे झाले आहे. त्याच्या या विकृतीमुळे परिसरात दहशत पसरली असून पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी चिंता निर्माण झाली आहे. बालकांवर द्रव्य फेकून चर्चेचा विषय बनू पाहणाऱ्या या व्यक्तीला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मोमीनपुरा येथे बालकांवर द्रव्य फेकण्याचे प्रकार सुरूच, तीन दिवसांत तीन चिमुकल्यांवर फेकल्या गेले द्रव्य
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 27, 2021
Rating:
