"आरोग्यमिञ" आरोग्य कार्डचा जनतेंनी लाभ घ्यावा !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ,चंद्रपुर तसेच परिवार विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत सोमवार दि.२७डिसेंबरला जिल्हा परिषद शाळा चुनाळा येथे आरोग्य मित्र हेल्थ कार्डच्या कँप घेण्याबाबत एक महत्वपूर्ण चर्चासञ आणि हेल्थ कार्ड काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्यमिञ या कार्डमुळे चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील नामांकीत खाजगी हॉस्पीटलमध्ये बहुतांश प्रमाणात सवलत व सुट दिल्या जाते. ग्रामीण तथा शहरी भागातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन या निमित्ताने आयाेजकांकडुन करण्यांत आले.

या वेळी सरपंच बाळनाथ वडस्कर पोलीस पाटील निमकर, साईबाबा इंदुरवार मुख्याध्यापक जि. प. शाळा चुनाळा, आरोग्य केंद्र चुनाळाच्या अंगणवाडी सेवीका व आशासेवीका मंदा धुर्वे, सोनाली वांढरे, वंदना वांढरे, वसंता मारपेली, चांदेकर वैद्यकीय अधीकारी, अशोकजी अंबागडे, सौरभ मादासवार , प्रशिल भेसेकर व इतर शिक्षकगण उपस्थित होते.
Previous Post Next Post