आरोग्य व्यवस्था व डेरा आंदाेलनातील कर्मचा-यांच्या वेतना बाबत आ.किशोर जोरगेवारांनी हिवाळी अधिवेशनात केले अनेक प्रश्न उपस्थित
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : आज साेमवारी हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य व्यवस्थेबाबत विविध प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले. तदवतचं यावेळी आमदार जोरगेवार यांनी शहरात गेल्या ब-याच दिवसांपासून सुरु असलेल्या डेरा आंदोलनातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथाही सभागृहा समोर मांडत त्यांचे वेतन कधी देणार असा प्रश्न देखिल उपस्थित केला.मुंबई येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनचा चौथा दिवस आहे. प्रश्न उत्तरांच्या तासाला बोलतांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आ.जोरगेवार यांनी आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात वांरवार होत असलेल्या औषधसाठाच्या तुटवड्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मेडिकल कॉलेजच्या बांधकामास विलंब होत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. 300 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि 100 खाटांचे महिला रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये संलग्न करण्यात आले आहे. त्यामूळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. हे मेडिकल कॉलेज कधी सुरु होणार आहे. असा प्रश्नही सुध्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला, कोविड काळात रुग्ण सेवा देणा-या कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही देखिल मांडला .येथील कंत्राटी कामगार वेतन न मिळाल्यामूळे मागील अनेक महिण्यांपासून आंदोलन करीत आहे. मात्र,अद्यापही त्यांच्या आदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. कोरोनाच्या महामारीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणा-या कर्मचाऱ्यांना हक्काच्या वेतनासाठी आंदोलनाची वेळ येणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे आ.जोरगेवार यांनी म्हटले असून या कर्मचा-र्यांचे वेतन कधी देता असा प्रश्न अधिवेशनात बोलतांना उपस्थित केला आहे. यावर आरोग्यमंत्री यांनी उत्तर देत याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वस्त केले आहे.
मागणीची दखल घेत प्रेक्षक गॅलरीतील आमदारांची व्यवस्था फ्लोरवर केल्याबद्दल आ. जोरगेवार यांनी सभागृह अध्यक्षांचे या वेळी आभार मानले.
आरोग्य व्यवस्था व डेरा आंदाेलनातील कर्मचा-यांच्या वेतना बाबत आ.किशोर जोरगेवारांनी हिवाळी अधिवेशनात केले अनेक प्रश्न उपस्थित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 27, 2021
Rating:
