बापूराव विश्वनाथ टोंगे यांचा सेवानिवृत्त सत्कार



सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयातील सेवक पदावर वयाची २५ वर्षे कार्यरत असलेले श्री. बापूराव विश्वनाथ टोंगे हे वयाच्या ६० व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयात लोकमान्य पगारदार सहकारी पतसंस्था, कर्मचारी कल्याण निधी व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्यांना पतसंस्थे तर्फे धनादेश, स्मृतिचिन्ह व भेट प्रदान करण्यात आली.

शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव मा. श्री. अशोक सोनटक्के, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे
प्रा. आनंद नार्लावर, प्रा. भास्कर पिसे, प्रा. अभिजित अणे, प्रा. गजानन अघळते, श्री. जयंत व्यवहारे ह्यांनी सत्कारमूर्ती श्री. बापूरावजी टोंगे ह्यांच्या कार्याला उजाळा देत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. राजू आगलावे यांनी तर उपाध्यक्ष श्री. अरविंद ब्राह्मणे आभार प्रदर्शन यांनी केले.
सूत्रसंचालनाची धुरा संघटनेचे सन्माननिय सचिव श्री. आनंद नगराळे यांनी पार पाडली. या कार्क्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. जयंत त्रिवेदी, मुकेश वाढई, राहुल करमरकर, संजय चुरे, संजय बिलोरीया आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
बापूराव विश्वनाथ टोंगे यांचा सेवानिवृत्त सत्कार बापूराव विश्वनाथ टोंगे यांचा सेवानिवृत्त सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on December 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.