• यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रथयात्रेचे जंगी स्वागत
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे आज शनिवार दि.२५डिसेंबरला संध्याकाळी ६वाजता चांदा यंग ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने पठाणपूरा राेड वरील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालया समोर जंगी स्वागत करण्यात आले.
या वेळी रथयात्रेत सहभागी झालेल्या तैलिक समाज बांधवांकरीता चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक- अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, वर्धा लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार रामदार तडस, कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगर सेवक नंदु नागरकर, विदर्भ तैलिक समाजाचे अध्यक्ष बबनरावजी फंड, माजी महापौर संगीता अम्रूतकर, वासुदेव देशमूख, अजय वैरागडे, सुरेश वैरागडे, रामदास बानकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ प्रमुख राशेद हुसेन, तापूष डे, विमल कातकर, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
तैलिक समाज घडविणारे तेली समाजाचे आराध्यदैवत, समाज सुधारक संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे आज तैलिक समाज बांधवांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयासमोर ही रथ यात्रा पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी रथयात्रेचे स्वागत केले. श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला व चरण पदुकाला पूष्पहार अर्पण करीत त्यांना या वेळी नमन केले.
चंद्रपूरात संत शिराेमणी श्री जगनाडे महाराज रथ यात्रेचे आगमन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 26, 2021
Rating:
