रोग निदान उपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ द्वारे सुतार पुरा येथे रक्तदान व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वणी शहराचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. विजयरावजी मूकेवार, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. संजय देरकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. किरणताई देरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शुगर, हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, आदी ची तपासणी करून डॉ विवेक गोफणे, डॉ नईम शेख, डॉ वैशाली गोफणे, डॉ अमरीन शेख यांनी उपचार व मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेकडो लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी रूपक अंड्रस्कर, शुभम झिलपे, मनीष बुरडकर, कल्पक अंड्रस्कर, रीतिक झिलपे , सचिन अंड्रस्कर, प्रफुल झिलपे, दिनेश साखरकर, अभय गटलेवार, राजीव साखरकर, प्रशांत झिलपे, ओमप्रकाश नवघरे, प्रसाद झिलपे, रितेश साखरकर, पंकज बुरडकर आदी नी परिश्रम घेतले.
रोग निदान उपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न रोग निदान उपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on December 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.