(मुकूटबन : जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण व तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम उपोषणकर्त्यांना फ्रुटी मँगो ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करताना.)
सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी : मुकूटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ पदे रिक्त असून, ही २३ रिक्त पदे न भरल्यामुळे मंगळवार (ता. २१) पासून ज्येष्ठ पत्रकार रफीक कनोजे व समाजसेवक नारायण गोडे हे मुकूटबन येथे आमरण उपोषणास बसले होते. या उपोषणाची सांगता शुक्रवार (ता. २४) संध्याकाळी सहा वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांचे हस्ते निंबु शरबत पाजून समाप्ती करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम व तहसीलदार गिरीश जोशी यांनी मुकुटबन येथे (ता. २२) उपोषणकर्त्यांना भेट घेऊन, आपण उपोषण सोडावे अशी विनंती केली. जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी सुध्दा व्हॉट्स अपद्वारे पत्र पाठवून (ता. २० व २३ ला) उपोषणकर्त्यांना उपोषणापासून प्ररावृत्त व्हावे अशी विनंती पत्राद्वारे केली. परंतु उपोषणकर्त्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. जोपर्यंत २३ रिक्त जागा भरण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही यावर ठाम होते.
त्यानंतर कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तीवारी यांनी मुकूटबन येथील रिक्त पदाचा प्रश्न मुख्यमंत्र्याच्या दरबारी मांडला तसेच अर्चना पाटील डायरेक्टर आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचेशी संपर्क साधून चर्चा केली. आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी मुंबई येथील अधिवेशनात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा केली. या सर्वांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेशी चर्चा करून उपोषणाच्या चौथ्या दिवशी (ता. २४) शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण व त्यांची जिल्हा चमू यांनी मुकूटबन येथे उपोषण मंडपला भेट दिली. त्यांनी उपोषणकर्त्या सोबत चर्चा करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांच्या समस्या जाणून घेतल्या. चर्चे अंती एक आरोग्य अधिकारी व दोन आरोग्य सेवकांची स्थायी स्वरूपाची नेमणूक करण्यात आली. तसेच झरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक औषधी निर्माण अधिकारी, एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ व एक लिपिक यांची आठवड्यातून तीन दिवसासाठी नेमणूक मुकूटबन येथे करण्यात आली. व उर्वरित पदे लगेच अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात येईल त्या भरतीतून ता. ५ जानेवारी २०२२ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र मुकूटबन येथील सर्व रिक्त पदे प्रथम प्राधान्याने व त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथील रिक्त पदे भरण्यात येईल असे लिखीत आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी दिले. या सर्व बाबी ज्येष्ठ पत्रकार रफीक कनोजे व समाजसेवक नारायण गोडे यांनी मान्य केल्या. यावेळेस मुकूटबनचे सरपंच मिना आरमुरवार, उपसरपंच अनिल कुंटावार, तहसीलदार गिरीश जोशी, तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम, गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, भालचंद्र बरशेट्टीवार, जगदीश आरमुरवार, सुरेश मानकर, रमेश उदकवार, खुपिया पोलीस संजय खांडेकर, नागेश अक्केवार, संजय आकीनवार, शेख शरीफ शेख कासम हे उपस्थित होते.
लिखीत आश्वासनाने चौथ्या दिवशी उपोषणाची सांगताआरोग्य केंद्रातील सर्व रिक्त पदे भरणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 28, 2021
Rating:
