सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष असलेल्या या युवकाने अचानक आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या युवकाचे लग्न जुळले होते, व साखरपुडाही झाला होता. पण बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला. तो सकाळी शेतात जातो म्हणून घरून निघाला. त्याच्या मागोमाग वडीलही शेतात गेले. वडिलांना तो शेतात निपचित पडून दिसला. वडिलांनी तत्काळ त्याला अन्य शेतकऱ्यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्याच्या या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पच्छात आई, वडिल व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे अद्यापही कळू शकले नाही.
पोलिस त्या दिशेने तपास करित आहे.
ब्राह्मणी येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 28, 2021
Rating:
