सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : "ग्रामीण विभाग हा आपल्या प्रगतीला अडथळा नसून उलट तेथे असणाऱ्या समस्या याच आपल्या संशोधनाचा आधार असतात. मूलभूत संशोधन आणि त्याचे नाविन्यपूर्ण अविष्कार यातील फरक आपल्याला समजून घेता यायला हवा. आपल्या समोर असणाऱ्या समस्यांचे निरीक्षण करीत त्यात संधी होता यायला हवी आणि त्या मिळालेल्या संधीचे सोने करता यायला हवे. आपल्या स्वतःचे ध्येय निश्चित करून त्याला छोट्या छोट्या भागात विभाजित करीत सातत्यपूर्ण सुयोग्य शैलीने ते ध्येय साध्य करणे हाच यशाचा मार्ग आहे." असे विचार युवा शास्त्रज्ञ ज्ञान फाउंडेशन चे कार्यकर्ते डॉ. अजिंक्य कोत्तावार यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिनर्जी या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमात इंवेंशन ते इनोवेशन याविषयी आवडते विद्यार्थ्यांची आभासी पद्धतीने संवाद करीत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ऍड लक्ष्मण भेदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी शिक्षण हे केवळ पैसा मिळवण्याचे माध्यम नसून इच्छाशक्ती आणि वेगळ्या प्रकारच्या प्रवासाची उर्मी आपल्याला संशोधनाचा आणि जीवनाचा आनंद प्रदान करेल असे म्हणत त्या विषयातील प्रत्यक्ष कृतिशील आदर्श म्हणून आजच्या वक्त्यांना आमंत्रित केले आहे हे अधोरेखित केले.
वक्त्यांचा परिचय करून देताना डॉ. मनोज जंत्रे यांनी कोत्तावार यांनी ५०पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मिळवलेले पुरस्कार, त्यांच्या नावावर असलेले ३४ पेटंट तथा ४००० वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी केलेले इनोवेशन यावर प्रकाश टाकला.
आपल्या अभ्यासपूर्ण रेखीव आणि थेट संवाद साधणाऱ्या शैलीत डॉ. कोत्तावार यांनी बसच्या हवेवर मोबाईल चार्ज करणारे यंत्र, बायोडिझेल चा पहिला प्रयोग टेरेस गार्डन नळाचे पाणी वाचवणारे साधन अशा स्वतः केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंवेंशन आणि इनोव्हेशन मधला नेमका फरक सोदाहरण विशद करून दाखविला.
एका ग्रामीण भागातून आलेले स्वकर्तृत्वावर इतकी मोठी उंची गाठलेली आणि तरीही मातीशी जुळलेले व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या साठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात अध्यक्षीय मनोगतात एड. लक्ष्मण भेदी यांनी वक्त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. नीलिमा दवणे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. किसन घोगरे यांनी केले.
ग्रामीण विभाग प्रगतीचे दालन- डॉ.अजिंक्य कोत्तावार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 28, 2021
Rating:
