अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस लिलाव सुरु


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

अंजनगाव सुर्जी : अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दि.06/12/2021 सोमवार रोजी कापुस लिलाव सुरु झाला. प्रथम आवक आणणाऱ्या शेतकरी दत्ता ढोक जवर्डी यांना समिती प्रशासक गुडधे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कापुस खरेदीदार व प्रकियाकार यांनी व समिती सचिव गजानन नवघरे यांनी सत्कार केला.

कापूस लिलाव करतांना अनिल मंगल पुरी खुर्माबाद यांच्या कापसाला सर्वाधिक रु. 8955 प्रति क्विंटल प्रमाणे भाव प्राप्त झाला. कापुस लिलाप प्रसंगी कापूस व्यापारी कमलेश पटेल, आशिष राठी, प्रविण नेमाडे, शहजाद अहमद, पंकज मोदी, अय्याज खान, सै. जलील , अय्युब खान, बबलु शेळके उपस्थित होते.

बाजार समिती कर्मचारी अमर साबळे, घोगरे, पोटे, आठवले कडव, निशाने यांनी लिलाव यशस्वी करिता प्रयत्न केले. आजपासून सर्व शेतकरी बंधुनी आपला कापूस विक्रि करिता आणावा असे बाजार समिती मध्ये दररोज सकाळी 10.00 ते1.00 व दुपारी 3.00 ते5.00 या वेळेत लिलाव होत असल्याने कापूस जिनिंग मालक व समिती प्रशासक व सचिव यांनी कापुस बाजार समितीमधे आणण्याचे आवाहन सर्व कापुस उत्पादक शेतकरी यांना केले.
अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस लिलाव सुरु अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस लिलाव सुरु Reviewed by सह्याद्री चौफेर on December 07, 2021 Rating: 5
Powered by Blogger.