सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : जयंती संपन्न होण्याचे अलौकिक वैभव असलेला महानतम ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. मानवी जीवनातील सर्व समस्यांवर नेमकेपणाने उत्तर देणारी भगवद्गीता संपूर्ण विश्वाचा आदरणीय ठेवा आहे. जेथे जेथे संस्कृत कार्यकर्ता आहे तेथे तेथे गीताजयंती संपन्न व्हावी या संस्कृत भारतीच्या व्यापक भूमिकेनुसार वणी नगरीत संस्कृत भारतीच्या वणी शाखेद्वारा श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने श्री गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी स्मिता नांदेकर,सविता गौरकार,संध्या पोफळी,भारती कोलप्याकवार,ऋतिका कोलप्याकवार, प्रांजल कोंडावार,नंदा कोंडावार,किरण कुंचमवार, सिमाताई गुंडावार ,ममता गादेवार,वृशाली देशमुख, कविता जन्नावार,कीर्ति कोंडावार,कोमल बोबडे,जान्हवी मंथनवार,आणि प्रणीता भाकरे यांनी सामुदायिक स्वरूपात श्रीमद्भगवद्गीतेच्या संपूर्ण अठरा अध्यायाचे पठन केले.
संस्कृत भारती च्या विदर्भ प्रांत शिक्षण प्रमुख प्रणिता भाकरे यांच्या प्रेरणेने कीर्ती कोंडावार यांच्या पुढाकारातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृत भारती वणीचे नगर मंत्री महेश पुंड, सुरेश बनसोड आणि संजय दखने यांनी विशेष परिश्रम घेतले.
सामूहिक पठना नंतर आरती तथा प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या मध्यवर्ती कार्यक्रमा सोबत लोकमान्य टिळक महाविद्यालय, शिक्षण प्रसारक विद्यालय, आदर्श प्रशासकीय महाविद्यालय तथा टागोर चौक अशा विविध स्थानी गीता जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
वणी मध्ये गीता जयंती संपन्न.
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 15, 2021
Rating:
