दोन दुचाकीस्वार समोरासमोर भिडले

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : मांगरुळ जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ४ जन गंभीर जखमी झाल्याची घटना काल दि. १४ डिसेंबर रोजी  सायंकाळी साडेसात च्या सुमारास घडली.

अपघातात केळापुर तालुक्यातील करंजी येथील सुनील पांडुरंग नागरे (३२), पत्नी किरण (३२), मुलगी तन्वी (१५), यांच्या सह वणीवरून गावाकडे दुचाकीने जात होते. दरम्यान, संदीप बोंडे (४०) रा. कुंभारी ता.घाटंजी हा दुचाकीने मारेगाव वणीकडे येत असताना मांगरुळ जवळ दोन्ही दुचाकीं समोरासमोर भिडल्या.  या अपघातात दोन्ही दुचाकीवरील ४ जन गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर अपघात ग्रस्ताना वैद्यकीय सल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.