सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तथा अपर जिल्ह्याधिकारी विद्युत वरखेडकर यांचे एका आदेशाच्या अनुषंगाने गाैण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील बल्हारपूर तालुक्यात महसुल विभागाचे फिरते पथक नुकतेच तयार करण्यांत आले आहे एव्हढेच नाही तर बाम्हणी जवळील केंद्रीय जल आयाेग कार्यालय समाेर स्थायी निगरानी बैठे पथक तयार करण्यांत आली असल्याची माहिती बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी काल मंगळवारी आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना दिली.
या निर्माण करण्यात आलेल्या पथकात बल्हारपूरचे मंडळ अधिकारी शंकर खाेब्रागडे, तलाठी राेहितसिंग चव्हाण, महादेव कन्नाके, नाैकरकर तलाठी, शंकर खरुले, या शिवाय बल्हारपूर तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन गजानन उपरे, सुनील तुंगडीवार, अजय गाडगे, यांचे सह पाेलिस शिपाई, पाेलिस पाटील व तहसील कार्यालयीन शिपाई अनिल विठ्ठलवार यांचा समावेश आहे. सदरहु पथक तालुक्यात कार्यरत झाल्यामुळे अवैध रेती वाहतुक करणां-या रेती तस्करांचे अक्षरश: धाबे दणाणले आहे. गाैण खनिज भरारी पथक नित्य कार्यरत ठेवल्यास निश्चितचं या तालुक्यातील रात्री हाेणारी अवैध रेती वाहतुक थांबेल असे जनतेत बाेलल्या जात आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की,या अगाेदर सुध्दा या विभागाच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार संजय राईंचवार यांनी बल्हारपूर तालुक्यातील अवैध रेती वाहनांवर नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहे.
बल्हारपूर तालुक्यात अवैध गाैण खनिजावर अंकुश लावण्यासाठी तथा दंडात्मक कारवायांसाठी भरारी पथक कार्यरत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 15, 2021
Rating:
