अवॉर्ड विनर महिलेचे सतत दोन वर्षा पासून शारीरिक शोषण, आरोपीवर गुन्हा दाखल

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : मागील दोन वर्षांपासून विवाहित महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या शहरातील एका युवकावर महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुक वरून झालेल्या मैत्रीतून हा प्रसंग घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फेसबुकवर मित्र झालेल्या या युवकाने महिलेला विविध आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढले, व तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून सतत दोन वर्ष त्या महिलेचे शारीरिक शोषण केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. आरोपी युवक हा तक्रारकर्त्या महिलेपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. तर महिला ही सौंदर्य स्पर्धांची अवॉर्ड विनर आहे. मोठमोठ्या महानगरांमध्ये झालेल्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये सदर महिलेला  प्रसिद्ध अभिनेत्रींच्या हस्ते अवॉर्ड मिळाले आहेत. आरोपीने तिला तिची परिस्थिती सुधारण्याचे आमिष दाखवत तिचे सतत शारीरिक शोषण केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. 

शहरातील मनिष नगर येथे राहणाऱ्या स्मित गोवर्धन तेलतुंबडे (२८) याची शहरातच राहणाऱ्या एका ३८ वर्षीय विवाहित महिलेशी फेसबुक ऍप वर फ्रेंडशिप झाली. कालांतराने त्यांची फ्रेंडशिप आणखीच घट्ट होत गेली. फेसबुक मित्राने तिच्या परिस्थितीचा आढावा घेत तिला विविध आमिषे दाखविली. ती त्याच्या भूलथापांना बळी पडली. त्याने तिला तिची परिस्थिती सुधारण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. नंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला अशीच आमिषे दाखवून तिचे सतत दोन वर्ष शारीरिक शोषण केले. त्याच्या पासून तिला एक अपत्यही असल्याचे तिचे म्हणणे आहे. १० ऑगस्ट २०१९ पासून तर १३ जून २०२१ या काळात आरोपीने सतत तिचे शारीरिक शोषण केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. अवॉर्ड विनर असलेल्या या महिलेला युवकाने फेसबुकच्या माध्यमातून मैत्रीचा प्रस्ताव ठेवत स्वतःकडे आकर्षित केले. नंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मैत्रीचा प्रवास शारीरिक संबंधांपर्यंत येऊन पोहचला, व त्याचा शेवट पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून झाला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी स्मित तेलतुंबडे याच्यावर महिलेने शारीरिक शोषण केल्याच्या आरोपावरून भादंवि च्या कलम ३७६, ४१७, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शिवाजी टिपूर्णे करीत आहे.
अवॉर्ड विनर महिलेचे सतत दोन वर्षा पासून शारीरिक शोषण, आरोपीवर गुन्हा दाखल अवॉर्ड विनर महिलेचे सतत दोन वर्षा पासून शारीरिक शोषण, आरोपीवर गुन्हा दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on December 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.