सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता शिवसेनेने पक्ष बांधणीला सुरुवात केली असून शहराबरोबरच ग्रामीण भागातही शिवसेनेच्या शाखा तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गावागावात शिवसेनेचे कार्यकर्ते तयार करून पक्षाला आणखी बळकटी आणण्याकरिता शिवसेनेचे पदाधिकारी अथक परिश्रम घेतांना दिसत आहे. गावागावात जाऊन कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी करून तेथे शिवसेनेची शाखा तयार करण्याचे सुरु केलेले अभियान माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणखीच गतिमान करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून शहरातील सानेगुरुजी नगर येथे महिलांची पहिली स्वतंत्र शाखा तयार करण्यात आली. जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीची ही पहिलीच स्वतंत्र कार्यकारणी असल्याचे सांगण्यात येत आहे. विश्वासभाऊ नांदेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात पहिलीच महिलांची आघाडी तयार करण्यात आली असून या महिला आघाडी शाखेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच शहरातील गोकुळनगर येथे शिवसेनेच्या दोन शाखा तयार करण्यात आल्या. तर तालुक्यातील चिखलगांव येथे दोन, वडगाव, कायर, नेरड, पुरड, पिंपरी, येथे प्रत्येकी एक शिवसेनेची शाखा तयार करण्यात आली. विश्वासभाऊ नांदेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या सर्वच शाखांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शाखा उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेच्या महिला जिल्हा उपसंघटिका डिमनाताई टोंगे, तालुका महिला संघटिका सुनंदा गुहे, शहर संघटिका सविता आवारी, उपशहर संघटिका तृप्ती आवारी, शाखा प्रमुख थेरे ताई यांच्यासह शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या सर्वच कार्यक्रमांना महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वतेकरिता तालुका प्रमुख रविभाऊ बोढेकर, शहर प्रमुख राजू तुराणकर, उपशहर प्रमुख महेश चौधरी, प्रशांत बलकी, प.स. सदस्य संजय निखाडे आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे कायर येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून अतिशय साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात नऊ शाखांचे उद्घाटन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 09, 2021
Rating:
