सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील महसुल विभागातील बहुचर्चित मंडळ अधिकारी प्रशांत बैस व महादेव कन्नाके यांना याच वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्या नंतर काेरपना तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास ठमके यांस आपल्या सहका-याचे मदतीने अडीच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्याची घटना काही दिवसांपूर्वी काेरपना तहसील कार्यालयाच्या परिसरात घडली हाेती. ठमके हे पांच वर्षापासून याच काेरपना तहसील कार्यालयाला वरिष्ठ लिपीक म्हणून काम करीत हाेते.
चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल येथील जिल्हा महसुल प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी विलास आर .ठमके यांना नुकतेच निलंबित केले असल्याचे व्रूत्त आहे .विशेष म्हणजे ठमके यांना सेवानिवृत्त हाेण्यांस सात ते आठ महिण्यांचा कालावधी शिल्लक हाेता त्यातच ते एका शेतक-याकडुन लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले हाेते.
एसीबीच्या जाळ्यात अडकलेला काेरपना तहसील कार्यालयाचा वरिष्ठ लिपीक विलास ठमके निलंबित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 09, 2021
Rating:
