सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्गुस येथे आज (९ डिसें.) ला गुरुवारी सकाळी 9:30 वाजता च्या दरम्यान एका मुख्य चाैकात भरधाव वाहनाने जाेरदार धडक दिल्यामुळे तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.
जखमी मध्ये दुर्वास मुन,किशाेर मंगर व सिध्दार्थ मेश्राम यांचा समावेश आहे. त्यातील मेश्राम यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली असून इत्तर दाेघांना किरकाेर मार लागला आहे. दरम्यान घटना स्थळावरुन वाहन चालक फरार असून घुग्घुस पाेलिस त्याचा शाेध घेत असल्याचे समजते. सदरहु घटनेतील जखमींना पुढील उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
घुग्गुस हा औद्योगिक परिसर असल्यामुळे वाहतुक माेठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्दळीच्या ठिकाणी तसेच बसस्थानक परिसरातील चाैकात वाहतुक पाेलिस नियमितपणे ठेवण्यांत यावा अशी येथील जनतेची मागणी आहे.
भरधाव वाहनाच्या धडकेत ३ जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 09, 2021
Rating:
