आज,वारी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेची ऑनलाईन कार्यशाळा


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर जागतिक स्तरावर वातावरण बदल, त्याचे परिणाम व उपाययोजना यावर फार मोठे विचार मंथन होणे फार गरजेचे आहे. त्यात विद्यार्थ्यांचा देखील सहभाग असावा जेणेकरून बाल वयापासून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थी पाऊले उचलू शकतील या उददेशानेच स्थानिक वारी सामाजिक बहुउद्देशिय संस्था चंद्रपूर च्या वतीने वातावरण बदल या विषयावर एका ऑनलाईन कार्यशाळेचे शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 ला ठीक 5 वाजता संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे वैशष्टय म्हणजे युरोप खंडातील रोमेनिया या देशातील कोरिणा सुजदा यांचे मार्गदर्शन व तेथील विद्यार्थ्यांचे चंद्रपुरातील विद्यार्थ्यांशी होणारा खुला संवाद
या कार्यशाळेत रोमेनिया देशाने वातावरण बदलावर मात करण्यासाठी नेमके कसे व कोणती पाऊले उचलली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये देवाण घेवाण होणार आहे.

या उपक्रमासाठी चंद्रपुरातील विविध नामांकित शाळांतील शिक्षक तसेच विद्यार्थी यांची हजेरी लागणार आहे. ऑनलाईन होवू घातलेल्या या कार्यशाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक व पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय खनके, सचिव प्रियांका वैरागडे यांनी केले आहे.

संस्थेचे सदस्य सोनाली पोहणे, मयुरी बालपांडे, भारत लाकडे, चंदा येरणे, सुचिता येनुरकर, नितेश उर्वेते, गणेश पोहणे स्नेहल अंबागडे व नरेन्द्र माेगरे उपराेक्त कार्यशाळा यशस्वि करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.
आज,वारी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेची ऑनलाईन कार्यशाळा आज,वारी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेची ऑनलाईन कार्यशाळा  Reviewed by सह्याद्री चौफेर on December 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.