सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : "आपल्या ठिकाणी असलेल्या केवळ वक्तृत्वच नव्हे प्रत्येकच गुणांचे उपयोजन देशभक्तीच्या विकासासाठी आणि राष्ट्रनिर्माण यासाठीच करायला हवे. आपल्या स्वतःमध्ये हे गुणी जागृत करून इतरांमध्ये ते संक्रमित करण्यासाठी आपल्या कौशल्यांचा उपयोग करायला हवा" असे विचार शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ तथा नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते विचार व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी मानवी विकासामध्ये वक्तृत्वाचे असलेले महत्त्व स्पष्ट करून आपल्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावी करायचे असेल तर सुयोग्य वक्तृत्व किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला.
या स्पर्धेमध्ये प्राची लाकडे, राज पारखी, तानिया पठाण, सुषमा डाहुले वैष्णवी निखाडे समृद्धी ताकसांडे गौरव नायनवार झाकेरून खान करिष्मा हुसेन सोनाली राजूरकर, शुमाएला शेख, दिनेश झट्टे आणि समीक्षा पारोधी या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यामध्ये वैष्णवी निखाडे गौरव नायनवार आणि झाकेरून खान या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर खामनकर, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख विकास जुनघरी आणि नेहरू युवा केंद्राच्या प्रियंका नाखले यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली. नेहरू युवा केंद्राच्या वतीने दीपिका मडावी आणि प्रियंका नाखले या स्पर्धेच्या वेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे संयोजक डॉ.अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन जयंत त्रिवेदी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.परेश पटेल ,संजय बिलोरिया पंकज सोनटक्के, दिनकर उरकुडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तालुका स्तरावरील यशस्वी हे विद्यार्थी यवतमाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील.
देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण हेच गुणांचे प्रयोजन हवे - अशोक सोनटक्के
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 04, 2021
Rating:
