सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
मारेगाव तालुक्यातील वेगांव येथील रहिवासी असलेले सहा जण कायर जवळील पिंपरी येथे कार्यक्रमात स्वयंपाक करण्याकरिता गेले होते. कार्यक्रमातील स्वयंपाकाचे काम आटोपल्यानंतर ते ऑटोने गावाकडे परतत असतांना वणी वरून मुकुटबनकडे जात असलेल्या मालवाहू पिकअप (MH २९ T ४६१०) वाहनाने ऑटो (MH २९ T ७६९५) ला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, धडक देणारे पिकअप वाहन रस्त्यावर उलटले. या अपघातात ऑटोमध्ये प्रवास करीत असलेले गंगुबाई सुरेश ठावरी, कल्पना धोबे, सुरेश ठावरी, तुळसाबाई पोटे, मयूर लक्षण ठावरी, हर्षल गायकवाड हे जखमी झाले. यातील तीन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. दुसऱ्या अपघातात वणी येथे मित्रांसोबत आलेला माजरी कॉलरी येथील रुपेश ढोके (३६) हा युवक भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील त्याचा मित्र सागर झरिया (२६) हा गंभीर जखमी झाला. हे दोघेही आपल्या अन्य मित्रांसह वणी येथील काम आटपून दुचाकी वाहनांनी आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान वणी वरोरा मार्गावरील नायगाव जवळ समोरून येणाऱ्या भरधाव कारने (MH २९ Z ७८६१) त्यांच्या दुचाकीला (MH ३४ W ६६७६) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक रुपेश ढोके हा जागीच ठार झाला. पोलिसांना दोन्ही अपघातांची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना उपचाराकरिता तर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
पुढील तपास पोलिस करीत आहे.
वणी शहरालगत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर ७ जण गंभीर जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 14, 2021
Rating:
