सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपुर - जगन्नाथ बाबा नगर स्थित ज्ञानार्चना अपंगस्नेह बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिव्यांग पालकांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला . कार्यक्रमाला अॅड. पारोमिता गोस्वामी, श्रीराम पान्हेरकर, प्रा. दुषंत नगराळे, अल्का मोटघरे, नेत्रा इंगोलवार आदीं प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
सखुबाई नानाजी डवरे आणि सुनंदा कोलते या दिव्यांगाच्या पालकांचा यावेळी शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि ब्लंँकेट देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. दिव्यांग पाल्यांना देखिल यावेळी काही भेटवस्तू देण्यात आल्या. दिव्यांगाच्या सर्वांगीन विकासात कुटुंबाची मोठी जबाबदारी असते. आज या ठिकाणी ज्या पालकांचा सत्कार झाला ते आमचे साठी मोठे ठरतात असे अध्यक्षस्थानावरुन बोलतांन डॉ.जयश्री कापसे या वेळी म्हणाल्या. अश्या प्रकारचा प्रथमच अभिनव उपक्रम राबविण्यात आला असुन ताे एक स्तुत्य उपक्रम आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर यांनी व्यक्त केले.
पदरी पडले पावन झाले असा विचार दिव्यांगाच्या सत्कार प्राप्त पालकांनी या वेळी बोलून दाखविताच तेथील वातावरण भावुक होऊन गेले व अनेकांच्या डाेळ्यांतील अश्रु अनावर झाले. हलाखीची स्थिती असतानांही आपल्या दिव्यांग मुलाचे संगोपन प्रेमाने करणां-या पालकांचा सत्कार करायची कल्पना अर्चना मानलवार- भोयर यांची होती. ज्याचे सर्वानी कौतुक केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधत सहजयोगा ग्रुपच्या आरती पंजाबी यांनी या वेळी माेलाचे मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक कुंदन खोब्रागडे, प्रफुल भोयर आणि पदाधिकाऱ्यांनी तसेच मुन्ना खोब्रागडे व इतर दिव्यांगानी कार्यक्रमाच्या यशास्विते करीता विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन दर्शना चाफले यांनी केले. एका वेगळ्या वाटेने जाणारा हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्यामुळे अनेकांनी या वेळी समाधान व्यक्त केले.
चंद्रपूरात पार पडला दिव्यांग पालकांचा सन्मान साेहळा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 14, 2021
Rating:
