सह्याद्री न्यूज नेटवर्क |
महागांव : दि.३१ ऑक्टो. २०२१ रोजी कासारबेहळ ग्रामपंचायत येथे ग्रामसभा घेण्यात आले आली. कोविड कालावधीत सर्व सभा ठप्प पडल्या होत्या, परिणामी अनेक प्रश्न, समस्या व कामं रखडली होती. कोरोनामुळे या दोन वर्षाच्या काळात एकही सभा घेता आली नाही. मात्र, हळूहळू सर्व पूर्वपदावर परिस्थिती येत असतांना पाहून कासारबेहळ येथे आज रोजी पहिली ग्रामसभा पार पडली. यासभे मध्ये तंटामुक्त अध्यक्ष पदी फेर निवड दशरथ राठोड यांची करण्यात आली आहे. उपस्थितांनी राठोड यांचे पुषगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या ग्राम सभेमध्ये समाजसेवक नंदकुमार मस्के यांनी काही विशेष मुद्दे मांडले ते पुढील प्रमाणे :
• रोजगार सेवक यांचे कोरोना काळात केलेल्या कामाचं मानधन देण्यात यावे.
• सार्वजनिक शौचालय च्या बाजूची उर्वरित मोकळी जागा, त्या जागेवर महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरीता जागा उपलब्ध करून द्यावी.
• सिंचन विभागाचा क्र.1 व क्र 2 येथील ज्या संस्थेला सिंचन विभागाने मच्छी व्यवसायासाठी तलाव देण्यात आले त्या संस्थेला लेखी स्वरूपात पत्र देऊन त्या मच्छी चे सध्याचे दर स्थानिकांना दर 200 रु. किलोने मिळत असल्यामुळे ते 120 रु. किलो करण्यात यावे.
• संबंधित (पं.स) विभागाने ग्रामपंचायत चे सन 2014 -15 मध्ये दिलेले गाव नमुना आठ कॉन्ट्रॅक्ट कोणत्याही शेजार्यांना विश्वासात न घेता, पाचशे ते हजार रुपये घेऊन ग्रामपंचायत ची खुली जागा व ग्राम रोड पैसे देऊन वाढविण्यात आले तरी, ग्रामपंचायत ने आजूबाजूच्या लोकांना विश्वासात घेऊन परत नमुना आठ तयार करण्यात यावा.
• गावठाणा येथील मोजमाप करून संबंधित लाभार्थ्यांना गाव नमुना आठ देण्यात यावा.
• सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे साथीच्या रोगाचे थैमान असून आरोग्य सेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, असे काही मुद्दे मांडण्यात आले. या गंभीर विषयाकडे सदर ग्रामपंचायत जातीने लक्ष देते किंवा नाही याकडे कासारबेहाळ व सेवानगर येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दशरथ राठोड यांची निवड :
या ग्राम सभे मध्ये दशरथ थावरा राठोड यांची फेरनिवड सर्वानुमते सलग तीन वेळा निवड करण्यात आली. तसेच या निवडी मध्ये नवनिर्वाचित लोळबा पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडीचे श्रेय तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राठोड यांच्या समवेत सर्व गावाकऱ्यांना देण्यात आले.
यावेळी सरपंच सुलोचना शरद राठोड, उपसरपंच विष्णू जाधव, ग्राम. सदस्य तथा माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव करे, ग्राम.सदस्य अर्चना जाधव, ग्राम.सदस्य आश्विनी राठोड, ग्राम.सदस्य कांताबाई पाटे, माजी सरपंच अशोक तुमवार, माजी सरपंच ताराचंद चव्हाण, दिपक करे, सचिव दोडके साहेब, नायक साहेबराव राठोड (सेवानगर), एम डी राठोड, सचिन जाधव, पोलीस पाटील अशोक करे, रामेश्वर पाटील (सेवानगर पो.पा.), निरंजन कवाने, छत्रु ठाकरे, लोडबा पाटे, राजु पाटे, सदानंद जाधव, कृष्णा कवाने सह ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप पिटलेवाड व रोजगार सेवक गाजुसिंग राठोड व सर्व गावकरी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कासारबेहळ येथे पहिली ग्रामसभा पार पडली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 01, 2021
Rating:
