सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव : युवा सेना प्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार तथा युवासेना सचिव श्री.वरुन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ विस्तारक श्री.दिलीप घुगे
युवासेना जिल्हा प्रमुख विशाल पांडे यांच्या उपस्थितीत युवासेना महागाव तालुका यांच्या पुढाकाराने महागाव येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल चालवुन हाताला काळ्या फित्या बांधुन काळे झेंडे दाखवुन आंदोलन करण्यात आले.
या वेळी युवासेना जिल्हा प्रमूख म्हणाले की, आधीच महागाई ने कळस गाठला असुन सामान्य जनता त्रस्त असताना केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, इंधन दरवाढ करतच असल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सामान्य जनता केंद्रातील महागाई फेम सरकार ला धडा शिकलव्याशिवाय राहणार नाही असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी युवा जिल्हा प्रमूख विशाल पांडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, युवासेना तालुका प्रमुख, उप.सभापती, राम तंबाके, शिवसेना शहर प्रमूख राजू राठोड, शिवसेना प्रसिद्धि प्रमुख सुमित गोविंदवाड, युवासेना शहर प्रमूख, ओम कसुमवार, शॅम कदम, ऋषिकेष बलखंडे, देशमुख, गजानन शिंदे, ऋषी दातकर, गणेश कदम, आशितोष कदम, सुमित लोंबडे, किरण कदम, लक्ष्मीकांत घाटोळे, सारंग पिसाळ, प्रविण कोकरे, यांच्यासह शेकडो शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
युवासेनाचे महागाव येथे पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात सायकल चालवुन आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 01, 2021
Rating:
