सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
यवतमाळ : कोजागिरी पौर्णिमेच्या केशर दुधाचा गोडवा, शरदा च्या चांदरातीचा गारवा आणि दीपावलीच्या उत्साहवर्धक चाहुलीचा वेध घेत यवतमाळ जिल्हा अंकुर साहित्य संघाच्या वतीने अभिव्यक्ती सभेचे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिव्यक्ती सभेचे अध्यक्षस्थानी महेश किनगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश गांजरे, जिल्हध्यक्ष व संयोजक विद्याताई खडसे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी दिनकर वानखडे, प्रमिलाताई उमरेडकर उपस्थित होते.
या अभिव्यक्ती सभेत
"गंधरलेल्या दहाही दिशा
सोनकिरणानी रंगली निशा
आशेचा किरण आला भरात!
थबकून गेली तुमची मिजास
दिवे लागले रे झकास झकास"!
या कवी गुलाब सोनोने यांच्या कवितेसह तात्यांनी राखूंडे, राजश्री बिंड, अभि.मनोहर शहारे, प्रमिला उमरेडकर, नितीन धोटे, सुरेश गांजरे, उषाताई खटे या सहभागी कविंनी अप्रतिम कविता सादर केल्या. जेष्ठ कवयित्री कल्पना देशमुख यांनी सादर केलेली-
'आयुष्यात आहे सुख
अलिप्तपणे जगण्यात
गुंतू नका कदापिही
नात्यांच्या मोहक गुंत्यात'!
ही चिंतनशील कविता होती,तर जिल्हा सचिव महेश अडगुलवार यांची 'सांगायचे राहूनच गेले' ही कविता महाविद्यालयीन जीवनाला उजाळा देणारी ठरली.नितिन धोटे यांनी "सोचो समझो जाणो तुम,बात दिलोकी मानो तुम ही कविता सादर केली",कवी दीनुभाऊ वानखडे यांनी प्रेम कसं होतं ही कविता सादर केली ते म्हणाले" आभयात मावत नव्हतं पण जरासही दिसत नव्हतं"
तालुका शाखाध्यक्ष प्रमोद देशपांडे यांच्या 'पाटलीन बाईच्या पाटल्या' या नर्मविनोदी कथेने हास्याचे कारंजे फुलविले.
अंकुर साहित्य संघाने साहित्य बरोबरच सामाजिक दायीत्वाच्या भूमिकेतून याच अभिव्यक्ती सभेत,आरती बेलसरे या होतकरू मुलीचा तिच्या कार्यासाठी व कोरोना युद्धात महत्वाची भूमिका बजावणा-या अलका शिंदे, विद्या गोळे, ज्योती चौरे या 'आशा सेविकांचा' सत्कार नगर सेविका तथा नगरपरिषदेच्या माजी शिक्षण सभापती निता केळापुरे यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याच वेळी अंकुरच्या सदस्या मनिषाताई केतकर यांच्यावर ओढवलल्या दु:खातून सावरण्यासाठी माहेरवाशिणीची हक्काची साडीचोळी देऊन भावनिक आधार देण्यात आला.
या प्रसंगी प्रास्ताविक करताना कृतध्यात व सांत्वना व्यक्त करताना संयोजक विद्याताई म्हणाल्या" असं माहेरच्या ओलाव्याची दारी फुलावी रांगोळी..
दुःख नको सोबतीला तडफडते मासोळी..
असं भयाण जगणं आता भुईच्या वाट्याला..
थोड्या प्रेमाच्या सुरांनी गंध यावा या मातीला...
या सभेचे आयोजन अंकुरच्या सदस्या उषाताई खटे यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोष्णा मोकडे यांनी तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष व मुख्य संयोजक सौ. विद्याताई खडसे तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव महेश अडगुलवार यांनी केले. या अभिव्यक्ती सभेला तालुका सचिव महेश मोकडे, आरती बेलसरे, उषा खटे अर्चना वाकूलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला कल्पना उघडे, सुवर्णा ठाकरे, दिपा गुघाणे यांची उपस्थिती होती.
अंकुरची अभिव्यक्ती सभा : साहित्य आणि सामाजिक भान जोपासत दिपावलीची उत्साहवर्धक सुरुवात...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 01, 2021
Rating:
