नालीच्या दुर्गंधीमुळे शेजारी त्रस्त - नगर परिषदेला तक्रार दाखल !



सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : नागभिड येथील प्रभाग सात मध्ये नामे प्रभुदास कारुजी खापर्डे यांनी आपल्या संडासचे बांधकाम केले असुन मलबा व सांडपाणी जाण्यांसाठी नालीचे खाेदकाम केले असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते. सध्या त्या नालीला जाेडलेला पाईप हा उघड्या अवस्थेत असून त्या (सांडपाणी) दुर्गंधीचा त्रास शेजारी असलेल्या वृषभ खापर्डे व त्यांच्या कुटूंबियांना अधिक हाेवू लागला आहे. दरम्यान वृषभ खापर्डे यांनी दि.१ नाेव्हेंबरला नागभिड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना या बाबतीत एक लेखी तक्रार दाखल केली आहे. या बाबत न.प.प्रशासनाने त्वरीत दखल घेवून संबंधितावर कार्यवाही करण्यांची मागणी त्या तक्रारीत केली आहे. सदरहु तक्रारीच्या प्रति वृषभ खापर्डे यांनी नामदार बच्चू कडु व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे पाठविल्या आहे.
येत्या तीन दिवसात या वर याेग्य ताेडगा न निघाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमांतुन आंदोलन करण्याचा इशारा नगर परिषदेला वृषभ खापर्डे यांनी दिला आहे.
नालीच्या दुर्गंधीमुळे शेजारी त्रस्त - नगर परिषदेला तक्रार दाखल ! नालीच्या दुर्गंधीमुळे शेजारी त्रस्त - नगर परिषदेला तक्रार दाखल ! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.