नियमबाह्य पद्धतीने मिनी टँकरने खुल्या बाजारात डिजेल विक्री करणाऱ्या ट्रान्सपोर्ट मालकावर गुन्हा दाखल
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : खाजगी मिनी टँकरच्या माध्यमातून खुल्या बाजारात डिजलची विक्री करणाऱ्या एका मिनी डिजेल टँकरला पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना खाजगी डिजेल टँकरने डिजल विक्री होत असल्याचे आढळल्या नंतर त्यांनी पोलिसांना कळवून सदर टँकर विरोधात कार्यवाही करण्यास सांगितले. पोलिसांनी परवाना नसतांना स्वमालकीच्या डिजेल टँकरने खुल्या बाजारात डिजल विक्री करणाऱ्या डिजल टँकरला ताब्यात घेऊन डिजलची विक्री करणाऱ्या आरोपीसह टँकर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. सदर डिजल टँकर हे श्री साई ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक जगबीर पुनिया यांच्या देखरेखीत डिजल विक्री करित असल्याचे कळते. या कार्यवाहीने ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांत चांगलीच खळबळ माजली आहे. तालुक्यात कोळसा खदानींचे जाळे पसरले आहे. कोल वाहतूकदारांच्या वेगवेगळ्या कोळसा खदानींमध्ये गाड्या सुरु आहेत. ट्रकांवर चढण्या उतरणाऱ्या चालकांना दररोज डिजल भरून द्यावे लागते. काही चालकांच्या खदानींमध्येच शिप चेंज होत असल्याने त्याच्या गाड्यांमध्ये स्पॉटवरच डिजल भरून द्यावे लागते. त्यामुळे वाहतूकदारांनी मिनी डिजल टँकर तयार केले असून त्याद्वारे ते स्वमालकीच्या गाड्यांमध्ये डिजेल भरतात. परंतु खाजगी डिजल टॅंकरने डिजल विक्री करण्याचा कोणताही परवाना ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी काढलेला नाही. नियमबाह्य पद्धतीने मिनी टँकरने डिजेल आणून गाड्यांमध्ये टाकले जाते. तसेच खुल्या बाजारातही डिजेलची विक्री करण्यात येते. अशाच एका नियमबाह्य पद्धतीने खुल्या बाजारात डिजेलची विक्री करणाऱ्या एका टँकरवर पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांची नजर पडली. त्यांनी लगेच ही माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी कोणताही डिजल विक्रीचा परवाना नसतांना मिनी डिजल टँकरने डिजल विक्री करणाऱ्या MH ३४ BG ६९२९ या टँकरला ताब्यात घेतले. वणी घुग्गुस रोड वरील टोल नाक्याजवळ सदर टँकर नियमबाह्य पद्धतीने गाड्यांना डिजल विक्री करतांना आढळून आले. टँकरने डिजल विक्री करणाऱ्या शंकर किसन जिवतोडे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता डिजल विक्रीचा कोणताही परवाना त्याच्याजवळ आढळून आला नाही. दरम्यान जगबीर पुनिया त्या ठिकाणी आला, व सदर टँकर मानकचंद जेठमल मालू यांच्या मालकीच्या भारत पेट्रोलियम वरोरा येथून आणल्याचे सांगितले. परंतु खुल्या बाजारात डिजेल विक्रीचा त्यांच्याजवळी परवाना आढळून आला नाही. पेट्रोल पंपाबाहेर डिजेल विक्री करण्याचा परवाना नसतांना खुलेआम मिनी टँकरने गाड्यांना डिजल विक्री करणाऱ्या जगबीर पुनिया (३७) रा. चिखलगाव व शंकर किसन जिवतोडे (४९) रा. नंदुरी या दोघांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. या कार्यवाहीने नियमबाह्य पद्धतीने मिनी डिजल टँकरने गाड्यांना डिजलची विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध भादंवि च्या कलम ३,७, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३,४,६ व अन्य कालांनंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
नियमबाह्य पद्धतीने मिनी टँकरने खुल्या बाजारात डिजेल विक्री करणाऱ्या ट्रान्सपोर्ट मालकावर गुन्हा दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 01, 2021
Rating:
