सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी-भालर मार्गावरील जंगल परिसरात कोंबडबाजार भरविणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून २ लाख २३ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कार्यवाही आज १ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३७ वाजताच्या सुमारास करण्यात आली. भालर मार्गावरील जंगल परिसरात कोंबड बाजार भरविला जात असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली. माहितीच्या आधारे ठाणेदारांनी पोलिस पथक तयार करून त्या ठिकाणी धाड टाकली असता काही इसम कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळतांना आढळून आले. कुणालाही सुगावा न लागू देता अतिशय चपळतापूर्वक ही धाड टाकण्यात आली. तरीही कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या काही इसमांना पोलिस आल्याचे कळताच त्यांनी तेथून पळ काढला. तर पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. दुचाक्या घटना स्थळावर सोडून आरोपी सुसाट पळाले. श्याम सोनटक्के यांनी वणी पोलिस स्टेशनचा पदभार संभाळल्यापासून अवैध धंद्यांवरील कार्यवाहीला वेग आला आहे. अवैध धंद्यांवर त्यांची करडी नजर असून अवैध धंदे करणारे त्यांच्या रडारवर आहेत. कोंबडबाजारा वरील या १५ दिवसातील ही दुसरी मोठी कार्यवाही आहे. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या मो. सलिम मो. मुस्ताक (३२) मारोती चंपतराव गुरनुले (४५) दोन्ही रा. रंगारीपुरा, मनिष गोविंदराव चवरे (३१), ललित मधू चवरे (२८), हरिकृष्ण मधू सप्रे (८५) तिघेही रा. सेवानगर यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून एक झुंजीचा कोंबडा, दोन लोखंडी धारदार काती, पाच दुचाक्या, रोख ३४२० रुपये, तिन मोबाईल हँडसेट असा एकूण २ लाख २३ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पाचही आरोपींवर मजुका कलम १२(ब), १२(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही एसपी डॉ. दिलिप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शाम सोनटक्के, परि. पोउपनि आशिष झिमटे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, संतोष आढाव, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी, यांनी केली. पुढील तपास परि. पोउपनि आशिष झिमटे करित आहे.
कोंबड बाजारावर पोलिसांची धाड, पाच आरोपींना अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2021
Rating:
