सह्याद्री न्यूज नेटवर्क |
पांढरकवडा : रा.प. कर्मचाऱ्यांना मान्य केलेल्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक रा प शासनाकडून होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचे जात आहे महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिल्या जात नाही कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाही शासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२१ पासून २८ टक्के महागाई भक्ता दिला जात असून, रा.प. कर्मचाऱ्यांना फक्त ९२ टक्के महागाई भक्ता दिल्या जात आहे. ३०/०६/२०१८ चे पत्रानुसार प्रशासनाने मान्य करूनही वार्षिक वेतन दर महा भाडे भक्ता शासनाप्रमाणे दिला गेला नाही २०१८ पासून महागाई भक्तांमध्ये वाढ होऊनही दिली नाही तसेच त्यांची थकबाकी दिल्या गेली नाही शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रिम 12500/ रुपये दिल्या जातो दोन वर्षापासून मागणी करूनही त्यामध्ये आर्थिक अडचण दाखवून ती वाढ दिल्या गेली नाही ही बाबी रा.प. कर्मचाऱ्यावर अन्याय करणारी आहे त्यामध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या २६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचललेली आहे कोरणा काळात रा.प. कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र प्रवाशांची सेवा केली त्यामध्ये करुणा संसर्ग होऊन ३०६ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला अशा कठीण परिस्थितीतही रा.प. कामगार आपले काम प्रामाणिकपणे करीत आहे एवढ्या कठीण परिस्थितीत काम करूनही हक्काचे देयके वेळीच मिळत नसल्याने कामगारांमध्ये फार मोठा असंतोष असल्याने दिवाळीसारखा सण समोर असतांना हक्काचे देयके कामगारांना मिळत नसल्याने कुपोषण सारखा निर्णय संयुक्त कृती समितीला द्यावा लागला.
मा.श्री. अनिल परब परिवहन मंत्री यांनी रा.प.कर्मचाऱ्यांना सन 2019 चा महागाई भत्ता देण्याचा व दिवाळी करिता दिवाळी भेट म्हणून 2500 देण्याची घोषणा करून रा प कर्मचाऱ्यांना पाने सुचली आहे. रा प कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट 15000/- मान्य असताना तुटपुंजी भेट जाहीर करून कामगारांची बोळवन केली आहे रा प कर्मचाऱ्यांना कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता वार्षिक वेतन वाढीचा १ टक्का वाढ घरभाडे भत्ता ८/१६/२४ टक्के उत्सव अग्रिम 12500 दिवाळी भेट 15000/- रुपये दिवाळीपूर्वी ही थकबाकी कामगारांना द्यावी. या मागणीकरिता रा फ कर्मचाऱ्यांनी संयुक्त कृती समितीच्या निर्णय यानुसार आज पासून राज्यभर आंदोलन उपोषण होत आहे. या उपोषणाची दखल शासन व प्रशासनाने न घेतल्यास 28/10/2021 पासून आगार पातळीवर बेमुदत उपोषण सुरू आहे.
या उपोषण आंदोलनामध्ये संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी सर्वश्री रवी कनाके, निरंजन खडकीकर, विठ्ठल गेडाम, मंगेश बावनकुळे, संजय राठोड, विनोद मार्कंड, संजय हंमद, कृष्णा कनाके, रमेश आत्राम, मोहन कोरेवार, अतुल खांडरे, गुरुप्रसाद जुमनाके, जय मेश्राम, शेख चांद, नागोराव ईचोडकर, विशाल कल्यमवार, शरद राठोड, चंद्रभान मेश्राम, रमेश कोडापे, अमोल सायकवाड, किसन मडावी, मधुकर नगराळे, लक्ष्मण आत्राम, उद्धव डंभारे, येसनसुरे, गजानन चांदेकर, विनोद पवार, आकाश बेतवार, महेश सिडाम, हिरालाल चिंतामण टेकाम, सुनील मोहुर्ले, सौ लक्ष्मी ताई निमसरकार, प्रतिभा गेडाम, जोशना करलुके, जयश्री मोहुर्ले, रेखा चव्हाण, सौ सरदार अर्चना नेहारे, वनिता उईके, इत्यादी असंख्य कर्मचारी उपस्थित होते.
एसटी कामगारांचा संप चिघळला: सेवासमाप्तीचे सूचनापत्र; पांढरकवडा आगारा समोर उपोषण, प्रवाशांची गैरसोय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 01, 2021
Rating:
