सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : आज रविवार रोजी सकाळी 10 वाजता बल्लारपूर तालुक्यातील मोैजा ईटोली येथील हत्ती नाला येथे वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग बल्लारपूर, save फॉरेस्ट save चंद्रपूर एनजीओ, महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद बल्लारपूर यांच्या संयुक्तिक विद्यमाने 50 मिटर x 2.5 मिटर वनराई बंधारा तयार करण्यात आला. यासाठी 1500 रिकाम्या सीमेंट बोरीचा वापर करण्यात आला असल्याचे तहसीलदार राईंचवार यांनी सांगितले. सदरहु बंधा-याची सुरुवात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते श्रमदान करून करण्यांत आली.
या वेळी बंधारा पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. प्रामुख्याने मुंडे acf, डॉ.दीप्ती सुर्यवंशी उपविभागीय अधिकारी, संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर, संतोष थीपे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी, सतीश नाईक save फॉरेस्ट save चंद्रपूर एनजीओ यांचे सहकारी यांनी श्रमदान केले. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे हस्ते या प्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.
वनराई बंधाऱ्याची श्रमदानातुन निर्मिती - जिल्हाधिकारी गुल्हाने यांची उपस्थिती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 31, 2021
Rating:
