राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचा येत्या १७ नोव्हेंबरला मूल दौरा


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदराव पवार यांचा येत्या १७ नाेंव्हेबररला विदर्भातील गडचिरोली,मूल, चंद्रपूर दौरा असून याच तारखेला मूल नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान मूल येथील बल्लारपूर विधानसभा क्षेत्र कार्यालयात होणाऱ्या कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम (नियाेजना) बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ, ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एक बैठक पार पडली.
सदरहु बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस मूल तालुक्याचे अध्यक्ष गंगाधर कुणघाडकर, जेष्ठ नेते निपचंदजी शेरकी, मूल शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका कार्याध्यक्ष महेश जेंगठे ,मूल तालुका कार्याध्यक्ष गुरुदास गिरडकर, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, पोंभूर्णा शहर अध्यक्ष भुजंग ढोले, पोंभूर्णा महिला शहर अध्यक्ष सोनाली भुरसे, बोदलकर, पावडे, दुर्वास घोंगडे, मूल तालुका युवक अध्यक्ष समीर अल्लूरवार, अशोक मार्गनवार, सोनल मडावी, हेमंत सुपणार, संदीप तेलंग, नंदू बारस्कर, प्रा.प्रभाकर धोटे, प्रशांत भरतकर, अंकीत वन्नतवार, दुशांत महाडोळे, ईश्वर लोनबले, अजय त्रिपतीवार, विनोद गुरनुले, आदीं पदाधिकारी उपस्थित हाेते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचा येत्या १७ नोव्हेंबरला मूल दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचा येत्या १७ नोव्हेंबरला मूल दौरा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.