सह्याद्री न्यूज नेटवर्क |
केळापूर, (३१ ऑक्टो.) : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ५३ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, वांजरी यांच्या वतीने सामुदायिक ध्यान आणि विनम्र अभिवादन करण्यात आले. या महोत्सवीप्रसंगी गावात रामधून फेरी काढण्यात आली व राष्ट्रसंत तुकडोजी मंदिरात भजनाचा कार्यक्रमही पार पडला.
यावेळी किसन शेडमाके, सुभाष कुमरे, राजू गुडेवार, ह.भ.प. ईश्वर महाराज मासटवार, चंद्रशेखरजी बुर्रेवार, मोहनजी राखुंडे, अर्जुनजी सोयाम, विश्वनाथजी पडलवार, नरेंद्र कावडे, अशोक कुमरे (पोलीस पाटील), महादेव गुडेवार व बालगोपाळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
वांजरी येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोसत्व साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 31, 2021
Rating:
