भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या ३७ व्या स्मृतीदिना निमित्त नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली कार्यक्रम संपन्न


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : भारत देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या ३७ व्या स्मृतीदिनी आज दिनांक ३१ ऑक्टोंबर, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने स्थानिय प्रियदर्शिनी चौकातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी इंदिराजींच्या पुतळ्याला मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यांत आली. या वेळी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय. च्या वतीने पुतळ्याला मालार्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

नरेशबाबू पुगलिया आपल्या मार्गदर्शन पर भाषणात या वेळी म्हणाले की, इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी आपल्या कणखर व दूरगामी नेतृत्वात देशाच्या व जनतेच्या विकासाचे व हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. भारताच्या स्वातंत्रप्राप्ती नंतर पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात विज्ञान, अणुशक्ती, उद्योग, कृषी सिंचन, शिक्षण इत्यादि क्षेत्रात देशाला प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी विविध योजना, प्रकल्प व धोरण अमलात आणली.
 पुगलिया पुढे म्हणाले, "राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी स्वतःची कुर्बानी दिलेली आहे. इंदिराजी आपल्या प्रेरणास्त्रोत असून आदर्श आहेत. इंदिराजींच्या आदर्शानुसार आपण कार्य केले पाहिजे हीच खरी राष्ट्रमाता इंदिराजीना श्रध्दांजली ठरेल".
यानंतर विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शासकीय सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ, बिस्कीट वाटप व मातोश्री वृध्दाश्रम येथे भोजन वाटप करण्यात आले.

सदरहु कार्यक्रमाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर, ग्रामिण जिल्हा अध्यक्ष गजाननराव गावंडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया, जिल्हा महासचिव अॅड. अविनाथ ठावरी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, नगरसेवक अशोक नागापूरे, इंटक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुधाकरराव कुंदोजवार, नगर परिषद चंद्रपूरचे माजी उपाध्यक्ष अरुनभाऊ बुरडकर, माजी नरगसेवक विनोद पिंपळशेंडे, काँग्रेसचे रमजान अली, कामगार संघटनेचे रामदास वाग्दरकर, विरेंद्र आर्य, गजानन दिवसे, अनिल तुंगीडवार, काँग्रेसचे सुधाकरसिंह गौर, बाबूलाल करुणाकर, मुरलीधर चौधरी, रतन शिलावार, गोविंदा आदे, अनिता बोबडे, संगिता बैद, अंजली लहामगे, सिमा शेडाम, अर्चना नागापूरे, हेमन्त आक्केवार, सचिन गावंडे, किष्णा यादव, दर्शन बुरडकर व शेकडों कार्यकर्ते उपस्थित होते.
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या ३७ व्या स्मृतीदिना निमित्त नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली कार्यक्रम संपन्न भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या ३७ व्या स्मृतीदिना निमित्त नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली कार्यक्रम संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.