... आणि म्हणून या लक्ष्मीला थोडं समजून घ्या, तिला प्रेम द्या

                       

                          Il लक्ष्मी ll 

           घरची लक्ष्मी असते पत्नी... 
           घराचे घरपण असते पत्नी... 
           दिव्यातली वात असते पत्नी...
          अंगणातील तुळस असते पत्नी...

पत्नीला कितीही उपमा द्या कमीच असते. तिच्या मुळे घर हसते तिच्यामुळे घर बोलते. तिच्या मुळे घराला घरपण असते. 
पण ऐक बोलावंसं वाटते कित्येक घरी पत्नीला समजून घेतले जात नाही. पत्नीला मान मिळत नाही. तिला समजून घेत नाही. जरा विचार करा ती आपलं माहेर सोडून आपली माहेरची माणसं सोडून सासरी येते. सासरच्या सर्वाना आपलं मानते. सर्वांचा सांभाळ करते. सर्वांची सेवा करते. ती तर नेहमी साठी आपल्या घरी आलेली असते. तुम्ही फक्त्त ऐक दिवस घर सोडून बघा तुम्हालाच कळेल काय अवस्था होते तुमची, आणि ती जर चार दिवस आपल्या घरी नसेल तर बघा घराची काय अवस्था होते. घराला घरपण राहत नाही. घर शांत राहील घर बोलणार नाही. आणि हो आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. साधं एखाद काम जरी करायचं म्हंटले तरी ते तुम्हाला जमत नाही. जे काम रोजच अगदी व्यवस्थित चाललेलं असते. ते फक्त पत्नीमुळे. 
 
ज्या वेळेला ती तुमचा हात धरून तीच घर सोडून या घरी आली या घरची लक्ष्मी झाली. तीन तुमचं घर सहज आपलं म्हणून .सावरलं यात माहेरच्या आठवणींच किती हुंदक तीनी आवरलं. तीनी तिची आवड तिची स्वप्न बाजूला ठेवली. पतीच स्वप्न पतीची आवड ती जपत गेली. 
 तिचे काही स्वप्न असतील तिच्या काही आवडी असतील हे कधी तिला तुम्ही विचारलं...
  
तिच्या हातचे जेवण रोजच जेवलात एखादा पदार्थ बिघडला तर लगेच नाव ठेवली. पण कौतुकाचे दोन शब्द कधी तुम्ही बोलले नाही. पण हे करत असतांना तिनं किती चटके सोसले तिला किती त्रास झाला याचा कधी तुम्ही विचार केला 
विचार केला नसेल तर विचार करा. 
  
तुम्ही चार पैसे कमावले तिने दोन पैसे वाचविले. तुमच्या नकळत भविष्यासाठी तिने साठवले....
 पती घर चालवते, पत्नी घर सांभाळते. चालवन्या पेक्षा सांभाळणं कठीण असते. तिला जर कुणी म्हंटल मुलं मोठी झाली मार्गी लागली. ती म्हणते चांगली निघाली बापावर गेली. वडिलांच्या संस्कारामुळे चांगली वागू लागली. पण मुलांना घडवतांना ती किती रात्र जागली तिला किती त्रास झाला याचा कधी विचार केला. अशीच वर्ष जात आहे ती मात्र सतत तुमच्या सुखात दुःखात तुमच्या सोबत आहे.

"संसाररुपी सागरात संघर्षाच्या लाटा ll 
 पतीच्या सुखदुःखात पत्नी चा बरोबरिचा वाटा ll 
खरंच आहे ती तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे. तसे तुम्हीही तिच्याशी दोन शब्द प्रेमाचे बोला. आणि मग बघा घर कसं आंनदी राहत घर सुखशांतीने भरून जाते. कारण घरातील लक्ष्मी आंनदी तर पूर्ण घर आंनदी म्हणून या लक्ष्मीला थोडं समजून घ्या, तिला प्रेम द्या आणि ही दिवाळी आंनदाने प्रेमाने साजरी करा.

... आणि म्हणून या लक्ष्मीला थोडं समजून घ्या, तिला प्रेम द्या ... आणि म्हणून या लक्ष्मीला थोडं समजून घ्या, तिला प्रेम द्या Reviewed by सह्याद्री चौफेर on October 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.