सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र, जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारे विमुक्त जाती भटक्या जमाती, व ओबीसी समाजाचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन 72 वसतिगृह मंजूर करून व राज्यातील कोरोना सदृश वातावरण संपले असल्याने राज्यातील सर्वच वसतिगृह तात्काळ सुरू करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी तात्काळ वसतिगृह सुरू करावे असे आशयाचे निवेदन नुकतेच विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्याचे बहुजन विकास मंत्री यांना आनंदराव अंगलवार यांचे नेतृत्वात व इतर पदाधिकाऱ्यांच्या एक शिष्टमंडळाने नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे भेट घेऊन दिले त्यांचेशी शिष्टमंडळाने चर्चा केली असता ना.वडेट्टीवार यांनी उपराेक्त विषय समजून घेऊन याबाबत सर्व आराखडा व निधी मंजूर करून घेतलेले आहे.
ओबीसी, व्ही. जे. एन.टी.साठी नवीन वसतिगृहासह सर्व वसतिगृह तात्काळ सुरू होणार - ना.विजय वडेट्टीवार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 31, 2021
Rating:
