सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (३१ ऑक्टो.) : वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे स्व.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी चा कार्यक्रम घेण्यात आला व स्व.इंदिराजी गांधी प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारताची प्रधानमंत्री प्रथम महिला प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी देशाची धुरा सांभाळली व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम असलेल्या त्यांना आर्यन लेडी म्हणून उपाधी देण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमोद निकुरे शहराध्यक्ष, प्रमोद वासेकर तालुकाध्यक्ष, इजहार शेख जिल्हा उपाध्यक्ष, ओम ठाकूर, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, डॉ मोरेश्वर पावडे, अनंत चौधरी सुधीर खंडाळकर, सुरेश बन्सोड, रफिक रंगरेज, बाबाराव गेडाम, राजेंद्र खोब्रागडे,  सौ ज्योती सुर, सौ संध्या बोबडे, मंगला झिलपे, वंदना धगडी, वंदना आवारी, मंदा पुसनाके, मंदा सोनारखन इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.