झरीत ओबीसी चे एक दिवशीय धरणे आंदोलन


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३१ ऑक्टो.) : झरी तालुक्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने शनिवार दिनांक ३० आक्टोबर २०२१ रोजी झरी तहसील कार्यालयासमोर स.११ ते दु.२ वाजे पर्यंत एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
   
ओबीसीचीं जातनिहाय जनगणना करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या मुजोर केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. विधिमंडळाच्या मागासवर्गीय समितीने दि.५-१०-२०१५ मागासवर्गीय मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीग्रह निर्माण करून देखबाल करण्याच्या सूचना केल्या होत्या. युती सरकारच्या काळात ३० जानेवारी २०१९ प्रत्येक जिल्ह्यात एक यानुसार ३६ वसतिगृहे सुरु करण्याचा आदेश देण्यात आले. २२ आगस्ट १९ ला नागपूर अहमदनगर यवतमाळ ज्या ठिकाणी नवीन वसतिगृह बांधण्यात अनुमती देण्यात आली.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एका जिल्ह्यासाठी दोन या प्रमाणे ३६ जिल्हयात एकूण ७२ शासकिय वसतिगृहे उभारण्याचे आश्वासन दिले. पण मात्र, कुठेच आजवरी एकही वस्तीगृह उभारलेले दिसत नाही. एक प्रकारे महाविकास आघाडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांची फसगत केली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळ खेळल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

ओबीसी विद्यार्थ्यांच्या भावना चा विचार करून प्रत्येक मुला मुलींसाठी सहा विभागात पाचशे पाचशे जागेचे वस्तीगृह बांधण्यात यावे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाडे तत्त्वावर सुरू करण्यात यावे. या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार झरी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
यावेळी ओबीसी जनगणना कृती समितीचे आशिष साबरे, प्रकाश बेरेवार, आजाद उदकवार, प्रफुल चुकलवार, साई बोंगिरवार, तुळशीदास आवारी, नेताजी पारखी, सौ.छबुताई आसुटकर, ममता पारखी, सविता व-हाटे, संतोष गोहकार, गणेश बुट्टे, संजय चामाटे, सुनील शिरपूरे निलेश निलमवार, प्रेम नडलवार यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
झरीत ओबीसी चे एक दिवशीय धरणे आंदोलन झरीत ओबीसी चे एक दिवशीय धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.