जड वाहतूक शहरातून बंद करून घुग्घुस नगरी प्रदुषण मुक्त करा - यासाठी आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण आरंभ !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० ऑक्टो.) : घुग्घूस शहरातून सर्रासपणे जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. तदवतचं प्रदूषणात वाढ होत आहे. दरम्यान, आम आदमी पार्टी द्वारा वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन गप्प बसले आहे.
घुग्घूस शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. शहरात प्रदूषण अत्यंत झपाट्याने वाढत असुन नागरिकांना वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांशी सामना करावा लागत आहे. लहान मुलांना दमा, शुगर, लकवा, सदृश्य आजार होत असुन शहरांमध्ये दररोज वाहतुकीची काेंडी हाेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नित्य दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात घडत आहे. प्रत्यक्ष पाहता जड वाहतूक WCL च्या मार्गाचा पर्याय उपलब्धआहे पण, WCL चे अधिकारी व ट्रांसपोर्ट कंपनी चे मधुर संबध असल्यामुळे हा प्रकार सातत्याने सुरु आहे.
प्रदूषण करणारे ट्रकवर शहरातून सरार्सपणे नियम मोडून ट्रकला ताडपत्री न टाकता ओवरलोड वाहतूक करण्यात येते. पण RTO विभाग सुध्दा डोळे बन्द करुन कुंभकर्णी झोपेत गेला आहे. ह्या सर्व समस्या लक्षात घेता आम आदमी पार्टी द्वारा ३० ऑक्टाेंबरला साखळी उपोषण करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर, प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, तहसिलदार, पोलिस स्टेशन घुग्घुस यांना देण्यात आले. परंतु याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी आज रोजी पासून आप तर्फे स्थानिक छत्रपति चौकात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. घुग्घुसचे शहर अध्यक्ष अमित बोरकर हे उपोषणाला बसले असून बहुजन समाज पार्टीने देखिल या आंदोलनाला आपले समर्थन जाहिर करत BSP चे अध्यक्ष मोहन येमुर्ले उपोषणात सहगागी झाले आहे.
उपाेषण मंडपस्थळी प्रामुख्याने आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, अभिषेक सपडी, सागर बिऱ्हाडे, राजेश चेडगुलवार, आशिष पाझारे, विकास खाडे, प्रशांत सेनानी, थिरुमालेश, निखिल बारसागडे, संदीप पथाडे, रवी शंतलावार, अभिषेक तालपेल्ली, भद्रावती तालुका अध्यक्ष सोनल पाटिल, भद्रावती ता. सचिव सुमित हस्तक, रजत जुमडे, सोनू शेट्टियार, करण बिऱ्हाडे,धनराज भोंगळे, दिनेश पिंपळकर, आदी उपस्थित होते.
जड वाहतूक शहरातून बंद करून घुग्घुस नगरी प्रदुषण मुक्त करा - यासाठी आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण आरंभ !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 30, 2021
Rating:
