दालमिया सिमेंट कंपनीने कामगारांचा अंत बघू नये - ॲड.संजय धोटे

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑक्टो.) : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा येथे दालमिया सिमेंट कंपनी सुरु होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे,परंतु त्या ठिकाणी कामगारांना अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे. त्याकडे वारंवार कामगार संघटना व कामगारांनी कंपनी प्रशासनाला यासंदर्भात माहिती देऊन उचित कार्यवाही करण्याची मागणी केली परंतु त्याकडे कंपनी प्रशासनाने पुर्णता दुर्लक्ष केले. दरम्यान, भारतीय सिमेंट मजदूर संघातर्फे दालमिया सिमेंट कंपनी येथे गेट मिटिंगचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कंपनी प्रशासनानी कामगारांना स्थानिक कामगारांना प्रामुख्याने कामावर घ्यावे व कामगारांचा अधिक अंत बघू नये. नारंडा परीसरातील सर्व कामगारांना कामावर न घेतल्यास काम बंद आंदोलन करू असा इशारा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी दिला आहे यावेळी ते अध्यक्षस्थाना वरुन बोलत होते. मंचावर भारतीय सिमेंट मजदूर संघाचे नेते ॲड.शैलेश मुंजे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, सिमेंट संघाचे उपाध्यक्ष किशोर राहुल, वनोजा सरपंच दिलीप पाचभाई, कढोली खुर्द उपसरपंच विनायक डोहे, पिपरी येथील माजी सरपंच कवडू कुंभारे, नारंडा उपसरपंच बाळा पावडे, अनिल मालेकर,अजय तिखट आदीं उपस्थित होते.

        
दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनाने वारंवार भारतीय सिमेंट मजदूर संघासोबत बैठक आयोजित केल्या कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वारंवार कंपनीतर्फे वेळ मागण्यात आला, परंतु १ वर्ष उलटूनही त्यांच्यातर्फे फक्त वेळकाढूपणाचे धोरण राबविले जात असून, कामगारांची दिशाभुल करण्याचा प्रकार कंपनी प्रशासनातर्फे होत आहे यासमोर असा प्रकार बिलकुल खपवून घेतला जाणार नाही अन्यथा कंपनी विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा भारतीय सिमेंट मजदूर संघाचे नेते शैलेश मुंजे यांनी दिला आहे.         
कंपनी प्रशासनाने नारंडा परिसरातील कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना कामावर पूर्ववत घेण्यात यावे, O&M कामावर घेत असताना त्यांच्या जुन्या पदस्थापनेनुसारच कामावर घेण्यात यावे, पॅकिंग प्लांट मध्ये सर्व जुन्या कामगारांना कामावर घेण्यात यावे, तसेच कामगारांना पगार वाढ देण्यात यावी अश्या प्रमुख मागण्या यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी कामगारांसोबत चर्चा करताना सांगितल्या.
     
यावेळी कंपनीतील कामगार व परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामरूप कश्यप, राजू गोहणे, सुनील टोंगे, प्रवीण शेंडे, वैभव गाडगे, अक्षय भोसकर, वैभव तिखट यांनी परिश्रम घेतले.
दालमिया सिमेंट कंपनीने कामगारांचा अंत बघू नये - ॲड.संजय धोटे दालमिया सिमेंट कंपनीने कामगारांचा अंत बघू नये - ॲड.संजय धोटे Reviewed by सह्याद्री चौफेर on October 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.