सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : लयास चाललेली वाचन आणि लेखन संस्कृती कायम राहावी तदवतचं नव्या दमाचे कवी तथा साहित्यिक निर्माण व्हावे या हेतूने पुरोगामी साहित्य संसद जिल्हा चंद्रपूर आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हास्तरिय आंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाेते "देशाची शान,भारतीय संविधान" असा या काव्य स्पर्धेचा विषय होता.दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातुन ४० महाविद्यालयिन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आयोजित या स्पर्धेत आपला सहभाग नाेंदविला दि.२४ नोव्हेंबरला श्रमिक पत्रकार भवन,(वरोरा नाका) चंद्रपूर येथे या काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध अधिवक्ते एड.राजेश सिंग होते.तर कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्य संसदेचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या हस्ते करण्यात आले,पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे,पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हाध्यक्ष एड.योगिता रायपुरे,कार्याध्यक्ष विजय भासारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, थोर विचारवंत,जेष्ठ पत्रकार प्रबोधनकार ठाकरे,साहित्यिक,पत्रकार आचार्य अत्रे,वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
प्रथम,द्वितीय,तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना ३ हजार,२ हजार,१ हजार रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह,व प्रशिस्ती पत्रक देण्यात आले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवाजी महाविद्यालयातील सुरज पचारे यांनी,दुसरा क्रमांक सर्वोदय महाविद्यालय गोंडपीपरी यांनी,तर तिसरा क्रमांक चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी आलम हिने पटकावला.प्रोत्साहन पर पुरस्कार शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्रतीक्षा वासनिक या विद्यार्थीनीला देण्यात आले.
यावेळी परीक्षक म्हणून नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेवर,प्रदीप देशमुख,मधुकर दुफारे यांनी उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली.स्पर्धेत नरेंद्र सोनारकर,विजय भासारकर एड.योगिता रायपुरे,मृणाल कांबळे,नरेशकुमार बोरीकर,पवन भगत,सविता भोयर,हेमा लांजेवार,संगीता घोडेस्वार, इत्यादींनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे संचालन सीमा भासारकर यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार मृणाल कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाला स्पर्धकांसह कवी व रसिक उपस्थित होते.
पुरोगामी साहित्य संसद तथा पत्रकार संघाच्या वतीने चंद्रपूरात पार पडली काव्य स्पर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 25, 2021
Rating:
