सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : तालुक्यातील रामेश्वर येथील एका इसमाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली.
रघुनाथ महादेव देऊळकर (60) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून देऊळकर यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
आत्महत्या केली असल्याची वार्ता पसरताच घटना स्थळी नागरीकांनी मृतदेहाकडे धाव घेतली. याघटनेची माहिती मारेगाव पोलीसांना देण्यात आली असता, पोलीस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 25, 2021
Rating:
